Ad will apear here
Next
स्टीम्ड पालक वडी


भरपूर पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फारसे आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. आज आपण पाहू या स्टीम्ड पालक वडीची रेसिपी
...................
पालकासारख्या गडद हिरव्या रंगाच्या भाज्या त्वचा, केस व हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय पालक हे प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करते. पालकाचे सेवन करण्याने आरोग्याला लाभदायक असे फायदे मिळतात. पालकामध्ये जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अॅमिनो अॅसिड असते. हाडांच्या मजबुतीसाठी व दमा नियंत्रित करण्यासाठी पालक हे उत्तम औषध आहे. 

पालकातील ल्यूटिन नामक अँटीऑक्सिडेंट डोळ्यांचे आरोग्य राखण्यात मदत करते. एएमडी हे डोळ्यामधील भागात गौण दृष्टी सोडते. ल्यूटिन एक असे रंगद्रव्य आहे जे मेक्युलास सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. संशोधनानुसार पालक हे बाकीच्या पौष्टिक भाज्यांसोबत सेवन केल्याने मोतिबिंदू टाळण्यातही उपयोगी ठरते.

इतके सारे पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मात्र मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फार आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा हा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. 

साहित्य :
मोठ्या पानांचा पालक – एक जुडी, बेसन (डाळीचे पीठ) – एक कप, आवडीनुसार हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले-लसूण - वाटण केलेले, गूळ किंवा साखर, आंबटपणासाठी एक चमचा चिंचेचा कोळ किंवा दोन चमचे दही, एक चमचा तेल (वरून फोडणी द्यायची असेल तर. फोडणीसाठी तीळ, मोहरी व  हिरवी मिरची) वरून पेरण्यासाठी कोथिंबीर आणि ओलं खोबरं.


कृती : 
- सर्वप्रथम पालकाच्या पानांच्या शिरा काढून तो मोठ्या तुकड्यात चिरून घ्या.
- बेसनात म्हणजेच डाळीच्या पीठात दही किंवा चिंचेचा कोळ मिसळून घ्या.
- इतर मसाले या पिठात घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट मिश्रण भिजवून घ्या. 
- कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा. 
- त्यावर पालकाच्या पानांचा एक थर द्या आणि बाकीचे पालकाचे तुकडे बेसनात घोळवून घ्या. 
- बेसनात घोळवलेले तुकडे कुकरच्या डब्यात वर पसरत जा आणि त्याचे थर करा. 
- वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता. 
- आता कूकरला शिट्टी  न लावता त्याचे झाकण लावून २० मिनिटे वाफ येऊ द्या. 
- व्यवस्थित वाफ आल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
- आवडीप्रमाणे त्याच्या वड्या पाडा. पथ्यासाठी या वड्या नुसत्या कोथिंबीर घालूनही खाता येतील 
- इतर वेळी मोहरी, तीळ, जिरे, मिरची घालून तेलाची फोडणी करून त्यावर घाला.
- खोबरे, कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा आणि वड्या सर्व्ह करा.

- डॉ. वृंदा कार्येकर 
ई-मेल : kvvrunda@gmail.com

(लेखिका पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ असून, होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQQBF
Similar Posts
भाज्यांचे रोल्स विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स
भाज्यांचा पौष्टिक खिमा आज पाहू या भाज्यांचा पौष्टिक खिमा...
डाळ-तांदळाचे घावन घावन हा तसा एक प्रचलित पदार्थ आहे. साधारणतः नाश्त्यासाठी हा पदार्थ केला जातो. आहारात डाळींचे महत्त्व आहेच. याच डाळींपासून बनवलेला हा पदार्थ मुलेही आवडीने खातील.
पुदिना-कोथिंबीर पुरी पुदिना आणि कोथिंबीर या तशा एकमेकींच्या जवळच्याच पालेभाज्या. पुदिना पाचक आहे, तर कोथिंबीर पित्तशामक आहे. त्याशिवाय या दोन्हींमध्ये अनेक जीवनसत्त्वेही आहेत. या दोन्ही भाज्या एकत्रितपणे खाण्यात आल्यास अर्थातच पोषणमूल्य वाढते. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत पुदिना-कोथिंबीर पुरीची रेसिपी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language